कृष्णा बनसोडे, साक्षी देठे सोलापूर जिल्हा खोखो संघाचे कर्णधार
धाराशिव येथे होणाऱ्या राज्य कुमार व मुली खो-खो संघ भाग घेणार
सोलापूर, दि. २५ ऑक्टोबर-
धाराशिव येथे २७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुमार व मुली खो-खो स्पर्धेसाठी कुमार संघाच्या कर्णधारपदी वेळापूरच्या कृष्णा बनसोडे तर मुली संघाच्या कर्णधारपदी वाडीकुरोलीच्या साक्षी देठे हिची निवड करण्यात आली.
कुमार संघाचे सराव शिबिर अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ वेळापूर येथे व मुली संघाचे शिबिर कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने वाडीकुरोली येथे झाले. वाडीकुरोली येथे या शिबिराचा समारोप कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष समाधान काळे यांच्या हस्ते झाला. यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे, वसंतराव काळे प्रशालेचे प्राचार्य संजय कुलकर्णी, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, तांत्रिक समितीचे सचिव उमाकांत गायकवाड, सहशिक्षक समाधान काळे, दशरथ काळे व पालक अनिल लामकाने आदी उपस्थित होते.
वेळापूर येथे ग्रामपंचायत सदस्य संजय मंडले, लक्ष्मण मंडले, त्रिमूर्ती केसरी बापू मंडले, भैय्या कोडग, बाबा चंदनशिव, श्रीनाथ खटके, शिवाजी जाधव व अजित बनकर यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. दोन्ही संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
संघ ः कुमार ः कृष्णा बनसोडे, शंभूराजे चंदनशिवे, आरमान शेख, अकबर शेख, प्रणव अडसूळ (अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), मोहन चव्हाण, चेतन चव्हाण, रवी दरगोंडा, अनिकेत चव्हाण (किरण स्पोर्टस्, सोलापूर), सुजित मेटकरी, विनायक मुर्डे (शिवप्रतिष्ठान मंगळवेढा), फराज शेख, सुजल गायकवाड (उत्कर्ष क्रीडा मंडळ, सोलापूर), शुभम चव्हाण (दिनबंधू मंद्रूप), अदित्य माडीकर (न्यू सोलापूर क्लब), प्रशिक्षक : सोमनाथ बनसोडे, संघ व्यवस्थापक : सतीश कदम.
मुली ः साक्षी देठे, स्नेहा लामकाने, श्रावणी देठे, समृद्धी सुरवसे, कल्याणी लामकाने (के.के. स्पोर्टस्, वाडीकुरोली), आश्विनी मांडवे, अन्वयी मंडले, प्राजक्ता बनसोडे, अनुष्का पवार (अर्धनारी नटेश्वर), गौरी काशीद, सपना बंडे (किरण स्पोर्टस्), मयुरी चोरमोले (विकास विद्यालय, अजनाळे), किर्ती काळे (साकत प्रशाला बार्शी), श्रेया चव्हाण (उत्कर्ष), अक्षता प्रचंडे (समृद्धी स्पोर्ट्स सोलापूर). प्रशिक्षक : अतुल जाधव, संघ व्यवस्थापक : पूजा सावंत.
——–