श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक
सोलापूर –
दि.24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथील राजकोट येथे सुरु असलेल्या 68 व्या नॅशनल स्कूल गेम्स स्विमिंग ॲण्ड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेत, सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कराताना डायविंग या क्रीडा प्रकारात १७ वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रीक साधली आहे.
श्रावणी ही बाळे येथील ज.रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेत श्रावणी ने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
दि. 26 नोव्हेंबर रोजी डायव्हींग मधील हायबोर्ड मध्ये खेळताना 227.15 गुणासह श्रावणीने गोल्ड मेडल पटकावले. दि. 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या 3 मीटर स्प्रींग बोर्ड मध्ये खेळताना 253.55 गुणासह दुस-या सुवर्ण पदकावर नांव कोरले आहे. याच क्रीडा प्रकारातील 1 मीटर स्प्रीग बोर्ड ची स्पर्धा दि.29 नोंव्हेबर रोजी पार पाडली असून, यामध्ये श्रावणी ही 226.00 गुणासह तिस-या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.
या स्विमिंग व डायव्हींग राष्ट्रीय स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा, मणिपूर, गुजरात, गोवा, आसाम, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेश्, दिल्ली, पंजाब या राज्यातील व केव्हीएस, सीआयएससीइ, आयबीएसएसओ, विद्या भारती, च्या मुलीनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्राला 22 गोल्ड, 18 सिल्वर, 15 ब्राँज, असे एकुण 55 पदके मिळाली. यामध्ये सोलापूरच्या एकटया श्रीवणी सुर्यवंशी ने 3 गोल्ड मेडल मिळवत हॅट्रीक साधत मोलाचा वाटा उचलला.
श्रावणीने आजवर डायव्हींग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशन च्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत
राज्य पातळीवर 18 गोल्ड, 5 सिल्वर, 1 बाँझ
राष्ट्रीय पातळीवर 12 गोल्ड, 5 सिल्वर, 2 बाँझ,
आतंरराष्ट्रीय 2 गोल्ड, 3 सिल्वर, 2 बाँझ
याप्रमाणे तिने एकूण 49 पदके वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका श्रीमती निर्मलाताई ठोकळ, अध्यक्ष सचिन भैय्या ठोकळ, सचिवा शिल्पाताई ठोकळ, प्रशालेचे मुख्याद्यापक मोहनराव घोडके, क्रीडाशिक्षक दशरथ गुरव व नफिसा शेख तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे कौतुक केले आहे.