CRIMEsolapur

तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुक

तिघांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर,(प्रतिनिधी):- शेत जमीनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुक केल्याची घटना उघड झाली. याबाबत पोलीसांकडे तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव बाबुराव चाकोते, जयशंकर महादेव चाकोते आणि तत्कालीन तहसिलदार उत्तर सोलापूर असे आरोपींची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूर शहर उत्तरचे माजी आमदार विश्‍वनाथ बाबुराव चाकोते यांचे शेतजमीन उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे गट नं.112/1 अशी असून त्यावर विश्‍वानाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते यांच्यासह चारजणांचे नावे होते. ती जमीन आमच्या कब्जे वहिवाईटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते याने आम्हाला कसलीच माहिती न देता आमचे नाव कमी करून परस्पर शेतजमीनीवर तत्कालीन तहसिलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकोते यांचे नाव लावून घेतले. तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्यावडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगर मध्ये असलेली जमीन परस्पररित्या आमचे नाव वगळून आम्हाला कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबुराव चाकोते यांचा मीच एकटा वारसदार आहे असे भासवून अधिकार्‍यांशी संगनमत करून आमची फसवणुक केली तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी फिर्याद सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात गुरनं.975/2024 प्रमाणे आणि हैदराबाद येथील हयात नगर पोलीसांकडे गुरनं.687/2021 प्रमाणे रितसर दाखल झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button