CRIME
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींचा जामीन फेटाळला
सोलापूर- येथील 1) गणेश कैलास नरळे वय-30 वर्षे, धंदा-मजुरी, 2) विष्णु चंद्रकांत बरगंडे वय- 50 वर्षे, धंदा- नोकरी, रा. दोघे गणेश मंदिर जवळ, औसे वस्ती, सोलापूर सोलापूर या दोघांनी मिळून फिर्यादीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याकामी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. व्ही. केंद्रे साहेब यांनी त्यांचा जामीन फेटाळला.
यात यात हकीकत अशी की,
- दि. 31/10/2021 रोजी मुख्य आरोपी गणेश नरळे व आरोपी विष्णू बरगंडे यांनी संगणमत करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, तिची बदनामी करण्याची धमकी देऊन पुणे येथे फिर्यादीची इच्छा नसताना देखील तिचेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला, अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने आरोपींविरुद्ध दाखल केली होती. सदर प्रकरणात फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी गणेश नरळे याच्याविरुद्ध जामीनपात्र स्वरूपाचे कलम लावून दोषारोपपत्र मा. न्यायदंडाधिकारी कोर्टात पाठवले, तर आरोपी विष्णु बरगंडे यास गुन्ह्यातून वगळल्याचा अहवाल कोर्टात पाठवला, त्यामुळे व्यथीत होऊन फिर्यादीने पोलिसांनी पाठवलेल्या अहवालाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फिर्यादीचे याचिकेची गंभीर दखल घेऊन मा. उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ केडर आय.पी.एस अधिकाऱ्याने करावा असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याकामी मा.पोलीस महासंचालकांनी सदरचा गुन्हा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे वर्ग केला होता. सदर गुन्ह्याकामी पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपास अधिकारी शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकचा तपास करून आरोपींविरुद्ध विरुद्ध सामूहिक बलात्कार कलमांतर्गत दोषारोप पत्र मा.न्यायदंडाधिकारी कोर्टात सादर केले. तदनंतर आरोपीनीं जामीन मिळणेकरीता मा. सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. सदरकामी मूळ फिर्यादीने ॲड. प्रशांत नवगिरे यांचे मार्फत आरोपींचे जामीन अर्जास तीव्र हरकत घेतली. मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास हरकत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले तसेच आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याबाबत कागदपत्रे दाखल करण्यात आली. मूळ फिर्यादी व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड.प्रशांत नवगिरे, ॲड.श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील सरकारतर्फे ॲड. दत्तुसिंग पवार तर आरोपी तर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.