रविवारी परमपूज्य ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचे व्याख्यान
सोलापूर,(प्रतिनिधी):- डॉ. राजीव दबडे आणि डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलच्या वतीने आदि शंकराचार्य यांच्या जयंती निमित्त माणिकप्रभु संस्थान माणिकनगरचे पिठाधिपती परमपूज्य सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचे रविवार दि. 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हिराचंद नेमचंद किर्लोस्कर सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. माधुरी राजीव दबडे यांनी दिली.
कृष्णामाई हॉस्पिटलच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात त्याच्याच अनुषंगाने आदि शंकराचार्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून परमपूज्य श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचे आदि शंकराचार्य यांचे कार्य आणि त्यांची जीवनशैली या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी त्यांच्या जीवनात ऑल इंडिया एस एससी स्कुल परिक्षेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देण्यात आले. तसेच सिंदिया स्कुल मध्ये उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून त्यांनी सुवर्ण पदक मिळवले.अद्वैतवेदांत हा त्यांचा संकल्पमत सिध्दांत आहे. आजपर्यत त्यांनी सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा केली. समाजातील गरीब लोकांच्या उन्नतीसाठी तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रमही त्यांनी राबवलेले आहेत. त्यांच्या अगाध ज्ञानाचा आणि आदि शंकराचार्य यांच्या वरील अभ्यासाचा लाभ सोलापूरकरांना व्हावा म्हणून तसेच तरूण पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी ती जपली जावी आणि त्याचे आचरण व्हावे कारण तरूण आपल्या देशाचे भविष्य आहे आणि प्रत्येक तरूणाने आपल्या देशाच्या सेवेसाठी योगदान द्यावे यासाठीचे संस्कार त्यांच्यावर घडले पाहिजे म्हणूनच आदि शंकराचार्य यांचे कार्य तसेच त्यांची जीवनशैली यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमासाठी सर्वानी विशेषतः किशोर वयीन,तरुण मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. दबडे यांनी केले.