विजय चव्हाण केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नवे प्राचार्य
सोलापूर,(प्रतिनिधी):-
केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले समादेशक विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश गृह विभागाने काढला आहे तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 च्या समादेशक पदावर पंकज अतुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहेमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रापैकी सोलापूर शहरात केगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र असून नुकतेच या केंद्रातून मोठ्या प्रमाणात पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्याचा कार्यक्रमही पार पडला प्राचार्य वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षापासून केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात चांगल्या सुधारणा करण्यात आल्या होत्या प्रशिक्षण पद्धतीत बदल ही करण्यात आले होते दोन वर्षाचा कालावधी त्यांचा पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली सातारा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली त्यामुळे केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य पद रिक्त झाले होते त्या जागी सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 चे समादेशक विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी पंकज अतुलकर यांची एस आर पी एफ बल गट क्रमांक 10 च्या समादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील जवळपास 20 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले त्यामध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत