12 तासात तालुका पोलिसांनी उघड केला दरोड्याचा गुन्हा
सोलापूर,(प्रतिनिधी):- फिरायला आलेल्या इसमाला पोलीस असल्याचे सांगून मारहाण करीत पैसे काढून दरोडा टाकणाऱ्या 7 जणांना सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद केले,आणि अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
दि. 03.09.2024 रोजी सायंकाळी 06.30 वा.सुमारास स्वप्निल चंद्रकांत भानप, (वय 49 व्यवसाय नोकरी रा.150 रेल्वे लाईन डफरीन चौक सोलापूर ) हे तळेहिप्परगा येथील शावर ऍ़न्ड टावरच्या समोरील बाजुस असलेल्या तलावाच्या बंधारा जवळ फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळेस तेथे 5 ते 6 अज्ञात लोक एका ऍ़टो रिक्षा मधुन येऊन फिर्यादीस तु कुठल्या मुलीला भेटायला आला आहे, आम्हाला माहिती आहे असे म्हणुन शिवीगाळी, दमदाटी करून तुला पोलीसांच्या हवाली करतो असे म्हणुन तेथे काही वेळाने दुचाकी मोटार सायकलीस फायबर काठी लावलेली दोन अज्ञात तेथे इसम आले. तेंव्हा त्यातील एका इसमाने फायबर काठी काढुन भानप यांना मी पोलीस असल्याचे सांगुन मुलीला भेटायला आला आहे काय, चोरी करायला आला आहे असे म्हणुन पोलीस ठाणेला चल असे त्यांना फायबर काठीने मारहाण करून इतर अज्ञात इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भानप यांचेकडे पैशाची मागणी करून त्यांचे पॅन्टच्या खिशातील 1000/-रूपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेऊन त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेऊन त्यांना फायबर काठीचा धाक दाखवुन त्यांचा फोन पे नंबरचा पासवर्ड विचारून त्यामधुन 43,000/-रूपये रक्कम फोन पे वरून जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेऊन भानप यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणुन स्वप्निल भानप यांनी पोलीस ठाणेच्या दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक 04.09.2024 रोजी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दरोडयाच्या गुन्हा दाखल झाला असून त्या गुन्हयाचा तपास Api/ सोमनाथ कदम यांचेकडे देण्यात आला होता.
या गुन्हयाची उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग.संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व गुन्हे प्रकटीकरणातील कार्यरत असलेले पोलीस अंमलदार हे तळेहिप्परगा येथे पेट्रोलिंग करून आरोपीच्या शोधार्थ असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे करवी संशयित आरोपी यांनी गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या बातमी नुसार सर्व संशयित आरोपी यांचा शोध घेतला तेंव्हा तेथे 7 संशयित आरोपी मिळुन आल्याने त्या सर्वांना गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतले. अधिक विचारपूस करून तपास केला असता त्या सर्वांनी मिळुन गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.त्यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सोलापूर नं.8 यांचे न्यायालयात दिनांक 05.09.2024 रोजी हजर केले असता मा. न्यायालयांनी त्या सर्वांची दिनांक 08.09.2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली होती.
दरम्यान अटक केलेल्या आरोपी यांचे कडुन गुन्हयात वापरलेली 1 लाख 50 रूपये किंमतीची रिक्षा, 50 हजार रूपये किंमतीची मोटार सायकल, 100 रूपये किंमतीची फायबर काठी व फिर्यादी यांना धमकी देऊन त्यांचेकडुन जबरदस्तीने काढुन घेतलेल्या रोख रक्कमपैकी 40 हजार हजर रोख रक्कम असा एकूण 2 लाख 40 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील गुन्हयातील अटक केलेल्या 7 आरोपी यांनी अशाच प्रकारे कोठे गुन्हे केले आहेत काय या अनुषंगाने त्याचेकडे तपास व त्यांच्या गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी झाले नंतर त्याचेकडुन आणखीन गुन्हयांची उकल होण्याची शक्यता असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी याव्दारे सांगितले आहे.
सदरची कारवाई .पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग.संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, गुन्हे प्रकटीकरणातील सपोफौ/विवेक सांजेकर,पोलीस हवालदार/राहुल महिंद्रकर, श्रीराम आदलिंग, पोलीस नाईक/ लालसिंग राठोड, अनंत चमके, नागेश कोणदे, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ व वैभव सुर्यवंशी यांनी पार पाडली आहे…