बदलत्या जीवनशैलीत श्वासावर नियंत्रण आवश्यक – डॉ.भुषणकुमार उपाध्याय
सोलापूर, (प्रतिनिधी):-
काही वर्षांपूर्वी दिवसा काम व रात्री आराम अशी पध्दत होती. आता कामाच्या व जीवनशैलीच्या बदलामुळे रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्यामुळे जीवनशैली बदलत आहेत. खाणे-पिणे यात बदल झाले त्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. असे मत माजी पोलीस अधिकारी डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी व्यक्त केले.
सोलापूर जनता सहकारी बँक गणेशोत्सव बौध्दिक व्याख्यानमालेत सोमवारी ‘ताण तणाव व मानसिक स्वास्थ’ या विषयावर ते बोलत होते.
- हृदय विकार, राग, चिडचिडेपणा समस्या होत आहेत. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर श्वासावर नियंत्रण ठेवा. जास्त जेवण करू नका व पाणी पिऊ नका. प्रमाणात मात्रा पाहिजे. सहा ते आठ तास झोपा, योगा, ध्यान, प्राणायाम, आहार तणावरहित जीवन हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे, असे मत माजी पोलिस महासंचालक तथा ताण-तणाव व्यवस्थापनाचे अभ्यासक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे बोलताना व्यक्त केले. मन स्वच्छ आणि आनंदी ठेवा सुखी राहाल. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मेंदू आहे त्यावर नियंत्रण ठेवा.
माणसाला ताण येतो तो खालपर्यंत ताण फिरत राहतो. म्हणजे उदाहरण- पती पत्नीला रागावतो, पत्नी मुलांना, मुलगा प्राण्याला मारतो प्राणी परत माणसाला चावतो, असे हे चक्र आहे. ते जर वेळीच थांबवले तर ताणच येणार नाही. शरीराला नऊ सिस्टम आहेत. महत्त्वाचे मेंदू, पाठीचा कणा, नस हे शरीरात प्रक्रिया करीत असतात. तणाव हे जीवशास्त्र आहे. माणसाचे जीवन श्वासांमुळे उंचावते. श्वास व मन या दोघांचे संबंध चांगले असतील तर माणूस दीर्घायुष जगतो. माणूस एका मिनिटाला १८-२० वेळा श्वास घेतो. श्वान वीसपेक्षा जास्त तर, कासव फक्त चार वेळा श्वास घेतो यामुळे कासव जास्त दिवस जगतो नंतर माणूस जगतो. यामुळे श्वास म्हणजे जीवन , त्याला जपा.
तणावाने शरीर बिघडते नाकाची डावी बाजू म्हणजे चंद्र नाडी व उजवी बाजू सूर्य नाडी • शरीरात थंडावा आणण्यासाठी डाव्याबाजूने व शरीर गरम करण्यासाठी उजव्या बाजूनं श्वास घ्या
• जेवल्यानंतर डाव्या कुशीवर झोपून डाव्या बाजूने श्वास घ्या. अन्नपचन होते
• तणाव, मन चंचल झालं, बेचैन झालं तर डाव्या बाजूने श्वास घ्या मानसिक, शारीरिक, भावना यावर नियंत्रण ठेवा, मनावर नियंत्रण ठेवा, मेदला सकारात्मक संदेश दया