सक्षम आणि सुसंस्कृत नागरीक घडवण्यासाठीच सेनगांवकर गुरूकुलची स्थापना – रविंद्र सेनगांवकर
सोलापूर,(प्रतिनिधी):- आजपर्यतच्या अनुभवाचा देशाच्या नव्या पिढीला लाभ मिळाला पाहिजे आणि एक सशक्त, सुसंस्कृत आणि सक्षम नागरीक तयार झाला पाहिजे म्हणूनच सेनगांवकर गुरूकुलची निर्मिती करण्यात आली. जुन्या गुरूकुल पध्दतीने शिक्षण देणारी ही अॅकॅडमी संपूर्ण व्यवसायिक नाही या अॅकॅडमी मध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेणार्याला 100 टक्के नोकरीची हमी आम्ही देत आहोत अशी माहिती राज्याचे प्रशिक्षण विभागाचे माजी विशेष पोलीस महासंचालक रविंद्र सेनगांवकर यांनी दिली. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी पुणे येथील भूगांव परिसरात विद्यार्थ्यांंना विविध प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षण देण्यासाठी सेनगांवकर गुरूकुलची त्यांनी स्थापना केली त्याबद्दल ते बोलत होते.
पोलीस दलातील 34 वर्षाच्या सेवेतून निवृत्त्त झाल्यानंतर समाजासाठी काही तरी करावे या उदात्त हेतुने रविंद्र सेनगांवकर यांनी पुण्यामध्ये भारताच्या भविष्यासाठी सुसंस्कृत आणि सक्षम अशी पिढी घडवावी म्हणून सेनगांवकर गुरूकुल अॅकॅडमी सुरू केली. समाजातील वाढती बेकारी आणि व्यसनाधिनता पाहून त्यांनी हा निर्णय घेतला. प्रशासकीय सेवेत चांगले तरूण यावेत म्हणून त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न आहे. या गुरूकुलाच्या माध्यमातून त्यांनी नवनवीन उपक्रम सुरू केले. जुन्या भारतीय गुरूकुल पध्दतीने शिक्षण देण्यासाठी भुगांव परिसरात सुरू केलेल्या या सेनगांवकर अॅकॅडमीमध्ये सुसज्ज अशी प्रशस्त इमारत, नाविण्यपूर्ण क्लासरूम, ज्ञानाचा खजिना असलेले ग्रंथालय, मार्गदर्शनासाठी अनुभवी आणि प्रतिभावंत शिक्षक, राहण्यासाठी आरामदायी हॉस्टेल, जेवणाची चांगली सुविधा, शारीरीक आणि मानसिक सृदृढ होण्यासाठीचे वातावरण निर्माण केलेले आहे.अगदी कमी खर्चात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीची आणि नोकरीची 100 टक्के हमी देणारे सेनगांवकर गुरूकुल महाराष्ट्रात एकमेवच आहे.
काय होता येईल –
एमपीएससी, युपीएससी, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनातील वर्ग 2 आणि 3 पदासाठी
भारतीय सेनेतील जवान, अग्निवीर, निमलष्करी जवान, महाराष्ट्र पोलीस,राज्य राखीव दल जवान, जिल्हा पोलीस दलातील चालक जवान, निशस्त्र पोलीस शिपाई
बीएसएफ,सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी,सीआयएसएफ मधील अधिकारी आणि जवान, रेल्वे भरती बोर्ड आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मधील विविध पदासाठीची तयारी
व्यक्तीमत्वाचा विकास
दिनक्रम
सकाळी व्यायाम, प्राणायम, ध्यान, प्रार्थना, नाष्टा, संगणक प्रशिक्षण, वाचन, शुध्दलेशन, विविध विषयावरील मार्गदर्शन, पुस्तके, वृत्तपत्रांचे वाचन, शारीरीक खेळ, बौध्दिक खेळ, मनोरंजन
समाजाला चांगले काहीतरी द्यायचे म्हणूनच या गुरूकुलची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये गुणवत्तापूर्ण आणि मर्यादीत तरूणांची निवड होते. अगदी माफक दरात चांगले करीयर घडवण्याची संधी तरूणांना मिळावी म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा तरूण तरूणींनी लाभ घ्यावा असे आवाहनही सेवानिवृत्त पोलीस महासंचालक रविंद्र सेनगांवकर यांनी केले आहे.
प्रवेश घेण्यासाठी संपर्क –
सेनगांवकर गुरूकुल
विघ्नहर्ता, खंडोबा मंदिरासमोर, 115, हिल टाऊन आयएनजीएसए मार्ट जवळ चांदनी चौका ते मुळशी रोड पुणे 4110022
मो.नं. 9823954000, 9920339999