शासकीय गोदामाकडील रस्ता बंद
सोलापूर,(प्रतिनिधी)ः- सोलापूर माढा लोकसभा निवडणुकीची मतमोजणी रामवाडी गोदाम येथे होणार असून त्यासाठी सोलापूर शहर पोलीसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. 19:55
दिनांक ०४/०६/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक-२०२४ मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम (ग्रेन गोडावून) रामवाडी याठिकाणी पार पडणार आहे. सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा होवू नये म्हणून शासकीय धान्य गोदाम कडे येणारे सर्व मार्ग बैरीकेट लावून बंद करण्यात आलेले असून मतमोजणी प्रक्रियासाठी येणारे लोकसभा निवडणुक करीता उभे असलेले उमेदवार, मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी व इतर जनतेच्या वाहनांना ग्रेन गोडावून परीसर व खालील प्रमाणे वाहनतळची व्यवस्था करण्यात आलेले आहे.
अ) रोड डायव्हर्सन / ब्लॉकेजेस पाईंट :-
१) मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंत येण्यास व जाण्यास
२) मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा, ब्रेन गोडावुन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास ३) थोरली इरण्णा बस्ती ते ग्रेन गोडावुन मार्गे संपूर्ण रोड येण्यास व जाण्यास
४) रामवाडी परीसरातून ग्रेन गोडावूनकडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास
५) घेनगोडाबुन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व जाण्यास
६) वाहन परवाना शिवाय इतर वाहनांना मतमोजणी परीसरात प्रवेश करणे बंद राहील.
ब) वाहन पार्कीग ठिकाणे
१) केंद्रीय विद्यालय-शासकीय कर्मचारी व व्हिआयपी करीता
२) होमगार्ड मैदान-पुणेरोड, मंगळवेढ, तुळजापुर रोड, अक्कलकोट रोड या मार्गावरुन येणारे वाहन धारकांकरीता ३) हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको.
क) पर्यायी मार्ग
१) सातरस्ता ते रामवाडी कडे जाण्यासाठी सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैय्या चौक-
मरीआई चौक नागोबा मंदीर मार्गे पुढे इच्छित स्थळी
) विजापुर रोडकडुन रामवाडी कडे जाण्यासाठी विजापुर रोड अशोक नगर नविन आरटीओ ऑफीस नागुनारायणवाडी
२ – सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी
३) रेल्वे स्टेशन कडून रामवाडी कडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन भैव्या चौक मरीआई चौक नागोबा मंदीर मार्गे पुढे
इच्छित स्थळी
ड) निवडणुक मतमोजणी निकाल ऐकणेसाठी नागरीकांसाठी थांबण्याचे ठिकाण
१) जांबवीर चौक ते मोदी चौकी दरम्यानचा रस्ता.
इ) पी.ए. सिस्टीम कोठे लावणेत येणार आहे.
१) जांबवीर चौक या ठिकाणी निवडणुक निकाल ऐकणे करीता स्पिकर लावणेत येणार आहेत.
ई) काय करावे, काय करून नये
१) निवडणुक निकालानंतर रॅली काढून रोड शो करू नये.
२) निवडणुक मतमोजणी निकाल ऐकणे करीता येणारे नागरीकांनी आपली वाहने पार्कीगचे ठिकाणीच
लावावीत. अन्य ठिकाणी वाहने लावून, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. ३) मतमोजणीचे ठिकाणी जाणेसाठी ज्या व्यक्तींना / वाहनांना पास देणेत आला आहे. अशा
व्यक्तींना/वाहनांना प्रवेश दिला जाईल.
फ) ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई :-
१) माहे मे २०२४ मध्ये एकूण २३६ ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करणेत आले आहेत. तसेच सदरची कारवाई
सध्य स्थितीत चालू आहेत.