CRIME

विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडून दोन गुन्हे उघड

सोलापूर,

टॉवेल कारखान्यातील चोरीसह दोन घरफोड्या उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले

शहरात रात्रीच्या होणाऱ्या घरफोड्याची माहिती काढुन, तसेच आरोपीतांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणेकामी मा.पोलीस आयुक्त  एम राजकुमार व  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सुचना दिल्या होत्या.

एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर हद्यीत आर. एस. इंडस्ट्रीज सी. 12/22 एमआयडीसी हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी दि. 13/05/2024 रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापुर येथे दाखल असलेला गुरनं 292/024 भादविस कलम 454,457,380 दाखल होता त्याअनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि  नंदकिशोर सोळुंके यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने बातमीदार पेरुन प्रभावी गस्त घालीत असताना पोकॉ/1618 सुहास अर्जुन यांना मिळालेल्या गोपनिय बातमीदाराने सांगीतलेल्या बातमी वरुन एक विधीसंघर्ष बालक यास दि.28.05.2024 रोजी सकाळी 09.30 वा.च्या एमआयडीसी डी बी पथकाने विधीसंघर्ष ग्रस्त बालकास गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापुर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या हातामध्ये असलेल्या एक कापडी पिशवी असलेल्या दोन कॅरीबॅग मध्ये गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी एका कॅरिबॅग मध्ये एमआयडीसी गुरन 292/024 भादविस कलम 454,457,380 चोरीस गेलेले रोख रक्कम 2,38,210/- व दुसऱ्या कैरीबैंग मध्ये एम.आय.डी.सी पोलीसठाणे येथे दाखल असलेला गुरनं 324/2024 भादविस कलम 454,457,380 या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाला पैकी 42,000/- रु रोख रक्कम व 7 ग्रॅम सोन्याचे दागिन व 15.05 चांदीचे दागिने असे एकुण 1,05,650/- रु मुद्देमाल सदर कापडी पिशवी मध्ये विधी संघर्ष ग्रस्त बालकाच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेले आहे.

तरी विधीसंघर्ष ग्रस्त बालकाला पकडण्यास आल्या नंतर त्याच्या कडुन एमआयडीसी पोलीस ठाणे कडील दोन गुन्हे उघडकीस करुन त्याच्याकडुन 3,43,860/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीस ठाणे कडील गुन्हेप्रकटीकरण पथकास यश आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त  एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ  विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त  अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  प्रमोद वाघमारे, पो.नि.  विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोहेकों राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोना, मंगेश गायकवाड, पोकों सुहास अर्जुन, शंकर यालगी, काशिनाथ वाघे, शैलेश स्वामी, दिपक नारायणकर, अमोल यादव, आमसिध्द निंबाळ अमर शिवशिगवाले भारत तुक्कुवाले, अजित मानें व देवीदास कदम यांनी सदरची कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button