100 आरोपींना जन्मठेप दोघांना फाशी पर्यंत पोहचवण्याचा जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांचा नवा रेकॉर्ड
सोलापूर :
तलाक झालेला असतानाही पत्नीला पुन्हा नांदायला ये म्हणून तगादा लावणाऱ्या जावयाने सासू मुमताज हाकीम पिरजादे (वय ६०, रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड) हीचा रागाच्या भरात खून केल्याप्रकरणात आरोपी जावई मोहम्मद शरिफ उर्फ गुड्डु चांदपाशा पटेल (वय ३८,रा. अभिषेकनगर, अक्कलकोटरोड, सोलापूर ) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस आझमी यांनी जन्मठेप आणि 10 हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.
जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद करून न्यायालयाच्या माध्मातून जन्मठेपेची शिक्षा झालेला हा शंभरावा आरोपी ठरला. यापूर्वी त्यांनी ९९ आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशी ठोठावण्यात न्यायालयात युक्तिवाद केला आहे. याशिवाय त्यांच्या युक्तिवादामुळे दोन ते २५ वर्षांपर्यंत
देखील अनेकांना शिक्षा लागली आहे.मयत मुमताज यांना तीन मुली व एक मुलगा असून त्यातील समरीन हिचा विवाह दहा वर्षांपूर्वी आरोपी मोहम्मद पटेल याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात सतत वादविवाद सुरू होते. चार वर्षांपूर्वी शहर काझी यांच्यामार्फत समरीनने तलाक घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून घटनेच्या दोन महिन्यांपर्यंत समरीन मयत मुमताज यांच्याकडेच म्हणजेच माहेरी राहायला होती.
तेव्हापासून घटनेच्या दोन महिन्यांपर्यंत समरीन मयत मुमताज यांच्याकडेच म्हणजेच माहेरी राहायला होती. घटस्फोटानंतरही आरोपी समरीनला त्रास देत होता. त्यावेळी फिर्यादी अॅड. सद्दाम हाकीम पिरजादे यांनी आरोपीला समजावून सांगितले होते. तेव्हापासून आरोपी मोहम्मद हा मनात राग धरून होता. त्याने जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादीला मारहाण देखील केली होती. या प्रकरणी आरोपीविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्यादी अॅड. सद्दाम कोर्टात आले होते, तर घरी त्यांची पत्नी व मयत (आई) मुमताज होती. आरोपी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरी गेला व हातातील लोखंडी रॉडने घरातील साहित्याची तोडफोड करू लागला. फिर्यादीच्या पत्नीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने सासू कोठे आहे, तिला बाहेर बोलवायला सांगितले. सासू मुमताज बाहेर आल्यानंतर त्याने समरीनला नांदायला पाठवणार की नाही, असे विचारले. तेव्हा मयत मुमताज यांनी नकार देताच आरोपी मोहम्मदने हातातील लोखंडी रॉड सासू मुमताज यांच्या डोक्यात घातला. त्यानंतर मुमताज रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि आरोपी तेथून निघून थेट एमआयडीसी पोलिसांत हजर झाला. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर सरकारर्फे अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. बडेखान यांनी काम पाहिले. अॅड. राजपूत यांनी पुराव्यानिशी केलेला अचूक युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
जिल्हा सरकारी वकिलांच्या कारकिर्दीतील शंभरावी जन्मठेप
जिल्हा सरकारी वकिल म्हणून अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी २६ एप्रिल २०१८ रोजी पदभार हाती घेतला. तेव्हापासून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती व परफेक्ट युक्तिवाद करीत न्यायालयाच्या माध्यमातून तब्बल १०० आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीची शिक्षा केली आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयातील त्यांचीही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. सासूचा खून करणाऱ्या जावयाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर अॅड.राजपूत यांनी यक्तिवाद केलेल्या गन्हाातील ही शंभरावी जन्मठेप ठरली.