धार्मिक
समाधान ध्यानमंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न सोलापूर,
समाधान ध्यानमंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न
सोलापूर
सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील तळे हिप्परगा परिसरातील समाधान ध्यान मंदिरात श्री.ष.ब्र. घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे, रॉबिन हूड आर्मी चे संचालक श्रीहिंदुराव गोरे, वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ याबरोबर जवळपास 150 लोकांनी योग मध्ये सहभाग घेतला.
संजीवनी संस्कार वंचित आश्रम हगलूर येथील विध्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्रत्येक व्यक्तीने योग केला पाहिजे ही काळाची गरज आहे.व योगाने अध्यात्मिक उन्नती प्राप्त करू शकतो असे महास्वामीजीं नी यावेळी सांगितले.
२१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश, *आध्यात्मिक* आणि *शारीरिक साधनेच्या* फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. असाच एक छोटासा संकल्प आपल्या श्री गुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींना सुचला आणि शिष्याच्या स्वरूपात *तुषार अवताडे* हा योग शिक्षक आपल्या समाधान आश्रमला लाभला, मागील अनेक दिवसापासून आपल्या आश्रम मध्ये योग शिबीर चालूच होते.