मराठा समाजाच्या वधू- वर पुस्तिकेचे प्रकाशन
सोलापूर :
मराठा सेवा संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या वधू वर परिचय मेळाव्यात नोंदणी झालेल्या वधु-वरांच्या माहिती असलेलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा रविवार दि. 21 रोजी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुला-मुलींचे विवाह जुळवताना जन्मपत्रिका पाहण्यापेक्षा प्रत्येकाची आरोग्य पत्रिका व कर्तुत्व पत्रिका पहावी. असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाच्या कार्यालयात हा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी विचारपिठावर जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख समन्वयक दत्ता मुळे, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, शिवमती अभिंजली जाधव, वधु वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष अंबादास सपकाळे, शहराध्यक्ष राम माने ,वासुदेव घाडगे, अजित सगरे, नवनाथ कदम, गोवर्धन गुंड उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले जिजाऊ वंदन घेण्यात आली प्रस्ताविक सदाशिव पवार यांनी
यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत पाटील म्हणाले
समाजामध्ये लग्न जमवताना जन्मपत्रिकेला जास्त महत्त्व दिले जाते. आजच्या काळात पालकांनी आणि मुला-मुलींनी जन्मपत्रिका पाहण्यापेक्षा प्रत्येकाची आरोग्य पत्रिका व कर्तुत्व पत्रिका पहावी. तसेच त्यांच्यावर होणारे संस्कार याकडे लक्ष द्यावे.
ग्रामीण भागात चांगली शेती, व्यापार करणारी अत्यंत कर्तृत्ववान मुले (वर) आहेत परंतु नोकरी आणि शहर याकडे मुलींचा ओढा जास्त आहे. त्यामध्ये बदल घडवून खेड्याकडे चला असे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे मत देखिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी डॉ. जी के देशमुख, दत्तामामा मुळे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन मोहिते, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, दत्ता जाधव, रमेश जाधव, लिंबराज जाधव, नितीन जाधव यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सदाशिव पवार यांनी केले. तर आभार राम माने यांनी मानले.