जागतिक स्तरावरील लक्ष कॉन्फरन्स साठी सोलापूरच्या चव्हाण मोटर्सची निवड
सोलापूर,(प्रतिनिधी):- जागतिक स्तरावरील मारुती सुझुकी चेअरमन क्लब संचालित “लक्ष” या कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण यांची निवड*
मारुती सुझुकी अरीना यांच्या जागतिक स्तरावरील “लक्ष” कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण यांची निवड झाली असून, ते अझरबेजानमधील बाकू शहरात होणाऱ्या या कॉन्फरन्ससाठी रवाना झाले आहेत.
या कॉन्फरन्ससाठी देशातील एक हजार डीलरमधून फक्त वीस डीलरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त दोन डीलरांची निवड झाली आहे. सोलापुरातील चव्हाण मोटर्सचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण यांना मारुती सुझुकीने या कॉन्फरन्ससाठी निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील चव्हाण मोटर्सची निवड मारुती सुझुकीने निर्देशित केलेल्या कठोर निकषांच्या आधारे केली गेली आहे. देशातून निवडलेल्या या डीलरमध्ये आपल्या शहरातील चव्हाण मोटर्सची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, आणि सर्व स्तरातून डायरेक्टर . घनश्याम चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
२०१० पासून मारुती सुझुकी डीलरशिपचा भाग असलेल्या चव्हाण मोटर्सने पहिल्या वर्षापासूनच देश-विदेशातील अनेक पारितोषिके पटकावली आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी बेस्ट डीलरशिप म्हणून पुरस्कार मिळवले आहेत. मारुती सुझुकीमधील रॉयल प्लॅटिनम सारखा मानांकित बँड मागील सात वर्षांपासून चव्हाण मोटर्सकडे आहे. देशातील निवडक डीलरमधील हा बँड मिळणारी आपल्या सोलापूर शहरातील चव्हाण मोटर्स व चव्हाण उद्योग समूहाने लाखो संतुष्ट ग्राहक आणि उत्कृष्ट सेवेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि आता जागतिक स्तरावर “लक्ष” कॉन्फरन्सच्या माध्यमातून चव्हाण मोटर्स चे बाबू चव्हाण आणि घनश्याम चव्हाण या बंधूनी आपली जागतिक ओळख निर्माण केली आहे.
या अभिमानास्पद निवडीमुळे सोलापूरकरांमध्ये आनंदाची लाट असून, आपल्या शहरातील घनश्याम चव्हाण हे मारुती सुझुकीचे प्रतिनिधी म्हणून जागतिक स्तरावर सोलापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत, याचा सर्व सोलापूरकरांना अभिमान आहे. ग्राहक, मित्र, आणि सर्व हितचिंतकांकडून घनश्याम चव्हाण यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे