सोलापूर :
सोलापूरचा रहिवासी असलेल्या तेजस वेणुगोपाळ गाडी या विद्यार्थ्याने पुण्यातील नामवंत अशा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या (बी. टेक.) परीक्षेत आयटी विभागात प्रथम क्रमांक मिळवला. त्याला या परीक्षेत सीजीपीएमध्ये 9.56 इतके गुण मिळाले. कॉलेजकडून त्याला सिल्व्हर मेडल देऊन गौरवण्यात आले. त्याचे शालेय शिक्षण सोलापुरातील व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वालचंद शास्त्र महाविद्यालयात झाले. पत्रकार वेणुगोपाळ गाडी यांचा तो पुत्र असून या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.